(म्‍हणे) ‘जे झाले ते होणारच होते !’

बहराइच (उत्तरप्रदेश) येथील रामगोपाल मिश्रा यांच्‍या हत्‍येवर अजमेरचे सरवर चिश्‍ती यांचे संतापजनक विधान

अजमेरचे सरवर चिश्‍ती (डावीकडे) आणि रामगोपाल मिश्रा

अजमेर (राजस्‍थान) – उत्तरप्रदेशातील बहराइच येथे श्री दुर्गादेवीच्‍या मूर्तीच्‍या मिरवणुकीवर आक्रमण करून रामगोपाल मिश्रा यांच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी अजमेरमधील  ‘अंजुमन सय्‍यद जदगन’ या कामगार संघटनेचे सचिव सरवर चिश्‍ती यांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना ‘घरोघरी हिरवा झेंडा उतरवून विशिष्‍ट धर्माचा झेंडा फडकावला जात आहे; मुसलमानांना शिवीगाळ केली जात आहे; मग फुलांचा वर्षाव होणार नाही, जे झाले ते होणारच होते’, असे विधान केले आहे. (असे असेल, तर हिंदूंच्‍या मिरवणुकांवर मशिदीजवळ होणार्‍या आक्रमणांविषयी हिंदूंनी कसे वागले पाहिजे ? त्‍यांनीही कायदा हातात घेतला पाहिजे का ? – संपादक)

चिश्‍ती पुढे म्‍हणाले की, आमच्‍या मिरवणुका निघतात; पण आम्‍ही कुणाला शिवीगाळ करत नाही. हे सर्व एका बाजूने होत आहे. येथे प्रसिद्ध मुसलमान मारले जात आहेत, तर कधी शीख मारले जात आहेत. यात सरकारचा हात नसेल, तर हे कसे होणार ?, असा प्रश्‍नही त्‍यांनी उपस्‍थित केला.

संपादकीय भूमिका

असे उघडपणे सांगणार्‍यांना पोलिसांनी कारागृहात डांबले पाहिजे ! या विधानांतून धर्मांधांची हिंदूंच्‍या प्रती कशी मानसिकता आहे, हे हिंदूंच्‍या आतातरी लक्षात येऊन आत्‍मघाती धर्मनिरपेक्षतेला ते तिलांजली देतील, हीच अपेक्षा !