विधानसभा निवडणूक २०२४
सांगली, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे मिरज येथून विधानसभा निवडणुकीत उभे रहाण्याचे निश्चित झाले आहे. तसे संकेत त्यांनी सामाजिक माध्यमांवरून पोस्ट प्रसारित करून दिले आहेत, दुसरीकडे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुरेश खाडे गेल्या काही वर्षांपासून मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध खात्यांचा कारभार पाहिला आहे. सध्याच्या महायुती सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते.