अयोध्येत मुसलमानाच्या घरातील फटाक्यांच्या साठ्याचा स्फोट : एक जण घायाळ

हैरिंग्टनगंजमध्ये समीउल्लाह याच्या घरात ठेवण्यात आलेल्या फटाक्यांच्या साठ्याचा स्फोट होऊन यात एक तरुण घायाळ झाला. स्फोटामुळे हे घर कोसळले.

एन्.आय.ए.च्या नावाने सामाजिक माध्यमांतून बनावट संदेशाचा प्रसार !

एन्.आय.ए.ने सखुलासा करत ‘अशा प्रकारचा कोणताही संदेश आमच्या यंत्रणेकडून प्रसारित करण्यात आलेला नाही. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे’, असे सांगण्यात आले आहे. 

कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर मारेकरी अजमेर दर्ग्याचा सेवकरी गौहर चिश्ती यांच्याकडे जाणार होते !

उदयपूर येथे २८ जून या दिवशी कन्हैयालाल यांची हत्या केल्यानंतर मारेकरी रियाज अत्तारी आणि महंमद गौस हे पळून अजमेर येथे दर्ग्याचा सेवेकरी गौहर चिश्ती याच्याकडे जाणार होते, असे समोर आले आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव साजरा

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी असलेला जन्मोत्सव येथील ‘भक्तवात्सल्याश्रमा’त भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला.

फेरीवाल्यांनी ‘बायोमेट्रिक सर्वेक्षण’ करावे ! – फेरीवाला समिती

फेरीवाल्यांनी ‘बायोमेट्रिक सर्वेक्षण’ केलेले नाही, त्यांनी ८ दिवसांत सर्वेक्षण करावे.

स्वत:च्या प्रवासासाठी दिला जाणारा विशेष राजशिष्टाचार मुख्यमंत्र्यांनी नाकारला !

‘हे सर्वसामान्यांचे शासन असून महनीय व्यक्तींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य द्यावे’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे ४० माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे सुमारे ४० हून अधिक नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी आले.

पोलीस आयुक्तांनी अमरावती शहरातील आतंकवाद्यांची पाळेमुळे उपटली असती, तर उमेश कोल्हे यांचे प्राण वाचले असते ! – कपिल मिश्रा, भाजप नेते

उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांना ‘हिंदु इकोसिस्टिम’ संस्थेकडून ३० लाखांचे साहाय्य !

मेळघाटातील (जिल्हा अमरावती) पाचडोंगरीत दूषित पाण्यामुळे दोघांचा मृत्यू; ७४ जणांवर उपचार चालू !

चिखलदरा तालुक्यातील पाच डोंगरी येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या आजारामुळे एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्याची मागणी

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे ‘एस्.आय.टी.’कडे असलेले अन्वेषण ‘एटीएस्’कडे वर्ग करण्याची मागणी कॉ. पानसरे यांच्या नातेवाइकांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. यावर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.