बांगलादेशातून घुसखोरी करण्यासाठी आतंकवाद्यांकडून वैद्यकीय आणि पर्यटन व्हिसाचा वापर !

अशांना भारतात येण्याची संमत्ती देण्यापूर्वी आपल्या सरकारी यंत्रणांकडून त्यांची पार्श्‍वभूमी तपासली जात नाही का ? सुरक्षेतील या गंभीर त्रुटीसाठी संबंधित उत्तरदायी अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

काश्मीरमधून १५० हून अधिक हिंदु  कर्मचार्‍यांच्या कुटुंबांचे पलायन !

जे १९९० च्या दशकात झाले, त्याची परत पुनरावृत्ती होत आहे. काश्मीरमध्ये हिंदू कालही सुरक्षित नव्हते आणि आजही नाहीत. काश्मीरमधील हिंदूंचे संरक्षण न करणार्‍या पोलिसांना आणि प्रशासनाला हे लज्जास्पद !

केंद्र सरकार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या गुन्ह्यात लवकरच अटक करणार ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना लवकरच अटक होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. केंद्राने सर्व यंत्रणांना त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवण्याचा आदेश दिला आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

(म्हणे) ‘चार मिनार नमाजपठणासाठी उघडा आणि अवैध भाग्यलक्ष्मी मंदिर बंद करा !’

चार मिनार हे भाग्यलक्ष्मीचे मंदिर आहे. त्यामुळे चार मिनारचा पूर्ण परिसर हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक आहे. त्यामुळे खान यांची मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराने पर्यवेक्षकाला बुटांनी केली मारहाण

‘लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत’, हे विसरणार्‍या काँग्रेसच्या आमदाराचा निषेध ! काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर कारवाई करतील का ? तसेच पर्यवेक्षकाने सरकारी कामात कुचराई करणे, हेसुद्धा गंभीर आहे. अशांवर कारवाई व्हायला हवी !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची हत्या

जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये हिंदूंना प्रतिदिन वेचून ठार मारत असतांना कुठलाही राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, साम्यवादी आदी त्याचा साधा निषेधही करत नाही, हे लक्षात घ्या !

हिंदु कर्मचार्‍यांना ६ जूनपर्यंत काश्मिरातील ‘सुरक्षित’ जागी नियुक्त करण्याचा राज्य प्रशासनाचा निर्णय

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘पी.एफ्.आय.’ आणि ‘सी.एफ्.आय.’ या दोन्ही संघटनांवर बंदी घातली पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

केंद्र सरकारने तात्काळ हे पाऊल उचलावे, असेच देशातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

..तर पाकचे ३ तुकडे होणार ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

भारत बलुचिस्तानला वेगळे करण्यासाठी प्रयत्नात असल्याचाही आरोप

काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार सोडवला पाहिजे ! – तुर्कस्तानचे राष्ट्रपती एर्दोगन यांचे फुकाचे बोल

काश्मीरचा प्रश्‍न हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. तो कसा आणि कुणी सोडवावा, हे सांगण्याचा प्रयत्न एर्दोगन यांनी करू नये, अशी समज भारताने त्यांना दिली पाहिजे !