‘पी.एफ्.आय.’ आणि ‘सी.एफ्.आय.’ या दोन्ही संघटनांवर बंदी घातली पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसाम सरकारचे मत आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) आणि कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सी.एफ्.आय.) या दोन्ही संघटनांवर बंदी घातली पाहिजे. मला आशा आणि विश्‍वास आहे की, भारत सरकार राज्यशासनाच्या विनंतीचा योग्य विचार करेल, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, जर तुम्ही बक्सा जिल्ह्यात गेलात, या दोन्ही संघटनांना आसामला अस्थिर करायचे आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये दारंग जिल्ह्यात गोरुखुती अतिक्रमण हटाव अभियानाच्या वेळी लोकांना चिथावणी देण्याच्या प्रकरणी या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची विनंती करणारा प्रस्ताव आसाम सरकारने केंद्राकडे पाठवला होता.

संपादकीय भूमिका 

केंद्र सरकारने तात्काळ हे पाऊल उचलावे, असेच देशातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !