भाग्यनगर (तेलंगाणा) येथील काँग्रेसचे नेते राशिद खान यांची हिंदुद्वेषी मागणी !
भाग्यनगर (तेलंगाणा) – काँग्रेसचे नेते राशिद खान यांनी येथील ‘चार मिनार’च्या ठिकाणी नमाजपठण करण्याची अनुमती मागितली आहे. तसेच येथील श्री भाग्यलक्ष्मी मंदिर अवैध ठरवून ते बंद करण्याचीही मागणी केली आहे. ‘जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.
१. राशिद खान यांनी दावा केला की, २ दशकांपूर्वी येथे नमाजपठण केले जात होते; मात्र नंतर मुसलमानांना रोखण्यात आले. आता आम्ही पुन्हा नमाजपठणासाठी स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत. आम्ही पुरातत्व विभाग आणि पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय यांना विनंती केली आहे.
Hyderabad: ‘Open Charminar mosque for Namaz, Bhagya Lakshmi temple is an illegal structure’, says Congress leader Rashed Khan.
Earlier, Congress Several had dragged Bhagya Lakshmi temple in Gyanvapi issue while trying to whitewash Aurangzeb's crimeshttps://t.co/EkqUakgTS2— OpIndia.com (@OpIndia_com) June 1, 2022
२. याविषयी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले की, असे करण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ शकते.
३. श्री भाग्यलक्ष्मी मंदिराविषयी राशिद खान म्हणाले की, जर मंदिरात प्रार्थना होत असेल, तर होऊ शकते; मात्र त्या ठिकाणी बंद असणार्या आमच्या मशिदीला उघडून आम्हाला नमाजपठण करण्याची अनुमती द्यावी. जर पुरातत्व विभाग मशीद बंद करते, तर त्याने मंदिरही बंद केले पाहिजे.
४. मौलाना अली कादरी यांनी सांगितले की, पूर्वी येथे नमाजपठण केले जात होते; मात्र एका व्यक्तीने तेथे आत्महत्या केल्यानंतर नमाजपठण बंद झाले.
राशिद खान यांना अटक करा ! – भाजप
भाजपचे माजी आमदार रामचंद्र राव म्हणाले की, काँग्रेस भाग्यनगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण करत आहे. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच राशिद खान यांना अटक केली पाहिजे. सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस केवळ अल्पसंख्यांकांच्या भावनांना स्वतःच्या लाभासाठी भडकावत आहे.
Read this also –
Fanatics ask Governor to remove Bhagyalakshmi Temple near Charminar
संपादकीय भूमिका
|