हिंदु कर्मचार्‍यांना ६ जूनपर्यंत काश्मिरातील ‘सुरक्षित’ जागी नियुक्त करण्याचा राज्य प्रशासनाचा निर्णय

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील हिंदूंच्या जिहादी आतंकवाद्यांकडून सातत्याने होत असणार्‍या हत्येच्या घटनांनंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने पंतप्रधान विशेष पॅकेजच्या अंतर्गत येणार्‍या काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांना ६ जूनपर्यंत काश्मिरातील ‘सुरक्षित’ जागी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

१. एका अधिकार्‍याने सांगितले की, ४ सहस्र ५०० स्थलांतरित कर्मचारी जिल्हा किंवा नगरपालिका यांमध्ये कार्यरत आहेत. मागील आठवड्यात ५०० कर्मचार्‍यांचे स्थानांतर करण्यात आले. यात १०० दांपत्ये आहेत.

२. केंद्रीय गृहमंत्री अमित गृहमंत्री शहा ३ जून या दिवशी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उच्च स्तरीय बैठक घेणार आहेत. बैठकीत केंद्रशासित प्रदेशाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी हिंदूंच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळ हिंदु कर्मचार्‍यांचे ‘सुरक्षित’ ठिकाणी स्थानांतर करणे, ही वरवरची उपाययोजना असून तेथील जिहादी आतंकवादाचा पूर्ण निःपात करणे ही परिपूर्ण उपाययोजना आहे. सरकारने त्या दृष्टीने पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !