गौहत्ती (आसाम) – महाराष्ट्रातील राजकीय पेच हा आसाममधील गौहत्तीपर्यंत पोचला आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसह येथील ‘रॅडिसन ब्लू हॉटेल’मध्ये थांबले आहेत. याविरोधात तृणमूल काँग्रेसकडून हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले.
#WATCH | Members and workers of Assam unit of TMC protest outside Radisson Blu Hotel in Guwahati where rebel Maharashtra MLAs, including Shiv Sena's Eknath Shinde, are staying.
Party's state president Ripun Bora is leading the protest here. pic.twitter.com/rfoD0fQSKU
— ANI (@ANI) June 23, 2022
‘राज्यात पूर आल्याने लोकांचा जीव जात असतांना महाराष्ट्रातील लोकांचे आदरातिथ्य केले जात आहे. केंद्राकडून पूरग्रस्तांसाठी एक रुपयाचेही साहाय्य अद्याप मिळालेले नाही; मात्र भाजप आमदारांची विक्री करण्यात व्यग्र आहे’, अशी टीका तृणमूलच्या नेत्यांकडून करण्यात आली.