भारतीय फूटबॉल महासंघाने खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी घेतले ज्योतिष आस्थापनाचे साहाय्य !

लोकांकडून होत आहे विरोध !

नवी देहली – भारतीय फूटबॉल महासंघाने पुढील तीन मासांसाठी नवी देहलीतील ज्योतिष सल्लागार आस्थापनाचे साहाय्य घेतले आहे. ‘संघाला ग्रह तार्‍यांची अनुकूल साथ लाभावी’, असाच बहुदा महासंघाचा विचार असावा, असे म्हटले जात आहे. यास लोकांकडून विरोधही केला जात आहे.

भारतीय फुटबॉल संघ

भारताने आशियाई फूटबॉल स्पर्धेच्या अंतिम २४ संघांमध्ये जागा मिळवली आहे. पात्रता फेरीतील तीनही सामने जिंकून भारताने त्याच्या गटामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आता या विजयामध्ये ज्योतिषशास्त्राचा किती लाभ झाला, याचा अभ्यास करावा लागेल; परंतु सदर ज्योतिष आस्थापनाला तीन मासांसाठी १६ लाख रुपये देण्यात आले आहेत. भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यासाठी ज्योतिषांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी संघासमवेत तीन सत्रे घेतल्याचे सांगितले जात आहे. संघातील खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी त्यांची नियुक्ती केल्याचेही सांगण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रारब्ध, देवाण-घेवाण आदी सूक्ष्मातील गोष्टींचा मानवी जीवनावर होत असलेला परिणाम बुद्धीने जाणून घेण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे ज्योतिषशास्त्र ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा घटनांना विरोध केला जातो, हे लक्षात घ्या !
  • केवळ ज्योतिषशास्त्रावर अवलंबून न रहाता आध्यात्मिक साधना केल्यास भारतीय संघाला यश निश्‍चित लाभेल, हे लक्षात घ्या ! त्यामुळे यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !