भाजप पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मुक्त करण्याचे सूत्र निवडणुकीत घेण्याच्या सिद्धतेत !

जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणूक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पिठाचे सूत्र उपस्थित करून प्रचार करण्याची सिद्धता होत आहे. काश्मिरी हिंदूंची शारदा पिठावर असीम श्रद्धा आहे.  काश्मिरी हिंदू अनेक वर्षांपासून येथे जाण्यासाठी महामार्ग बनवण्याची मागणी करत आहेत. काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्याच्या पाक सीमेवरून शारदा पीठ केवळ १० किलोमीटर अंतरावर आहे.

भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रिंकू चौधरी यांनी सांगितले की, वर्ष १९९४ मध्ये संसदेमध्ये पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. अशा वेळी श्री शारदा पिठामध्ये जाऊन पूजा करण्यासाठी महामार्ग बांधण्याची मागणी असो किंवा पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याचा विषय असो, तो पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे.