हिंसेसाठी चिथावणी देणे, हे शांतता, सहिष्णुता आणि सद्भाव यांच्या विरोधी ! – भारत

भारताचे उपस्थायी प्रतिनिधी आर्. रवींद्र

न्यूयॉर्क – हिंसेसाठी चिथावणी देणे, हे शांतता, सहिष्णुता आणि सद्भाव यांच्या विरोधी आहे, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे उपस्थायी प्रतिनिधी आर्. रवींद्र यांनी केले. युक्रेनवर आयोजित सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, लोकशाहीला सशक्त करण्यासाठी घटनात्मक सीमेत राहून विचार करणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण आहे, असे भारत मानतो. लोकशाहीच्या सिद्धांतांवर आधारित समाजरचना विविध समुदायांना एकत्र रहाण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करते. द्वेष पसरवणारी भाषणे आणि भेदभाव यांच्या विरोधात अभियान राबवतांना काही निवडक धर्म अन् समुदाय यांच्यापुरते सीमित न रहाता यामध्ये सर्व प्रभावितांना (धर्म अथवा समुदाय यांना) सहभागी करून घेण्याचे संयुक्त राष्ट्रांचे दायित्व आहे.