अमेरिकेतील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करा ! – हिंदु अमेरिकन फाऊंडेशन

अशी मागणी का करावी लागते ? जी अमेरिका भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांवर कथित रूपाने अत्याचार वाढल्याची आवई उठवते आणि भारतविरोधी निराधार अहवाल बनवते, ती स्वत:च्या देशातील अल्पसंख्य हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण का करत नाही ?

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याची पोहरादेवीच्या महंतांची  मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

बांगलादेशमध्ये हिंदु तरुणीचे फेसबूक खाते ‘हॅक’ करून त्याद्वारे इस्लामविषयी अवमानकारक मजकूर प्रसारित !

इस्लामिक देशात अल्पसंख्य हिंदू असुरक्षित ! या घटनेविषयी भारत सरकारने बांगलादेशला खडसावले पाहिजे !

हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून चालवण्यात येणाऱ्या ‘विद्यामाता हायस्कूल’ची मान्यता रहित करा ! – दादा कांबळे, जिल्हा सचिव, मनसे

हिंदूंना लुबाडणार्‍या आणि त्यांच्या पाल्यांना ‘जन्महिंदू’ बनवणार्‍या ख्रिस्ती शाळांवर बहिष्कार टाका !

अभिनेत्री केतकी चितळे यांना जामीन संमत !

पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सूडबुद्धीने नोंद केल्याचा दावाही केतकी यांनी याचिकेतून केला होता. त्यानंतर आता केतकी यांना जामीन संमत करण्यात आला आहे.

कल्याण येथील अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते कै. प्रमोद जोशी यांना हिंदुत्वनिष्ठांकडून श्रद्धांजली !

या वेळी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांचे हिंदुत्वाचे कार्य पुढे घेऊन जाण्याचा निश्चय केला.

गौंडवाड (जिल्हा बेळगाव) येथे युवकाच्या हत्येनंतर हिंसाचार !

सतीश पाटील यांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने काही वाहने, तसेच काही घरे यांना आग लावून दिली. या प्रकरणी हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी ४ लोकांना, तर आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.

आषाढी वारीनिमित्त सोलापूर रेल्वे विभागाकडून १० दिवसांत १२५ विशेष फेऱ्यांचे नियोजन !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुणे-पंढरपूर, कुर्डूवाडी-मिरज, लातूर-मिरज, भुसावळ-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, बिदर-पंढरपूर आदी मार्गांवर विशेष रेल्वे धावणार आहेत. या गाड्यांमध्ये सर्वसामान्य (जनरल) तिकिटावर वारकऱ्यांना प्रवास करता येणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण !

गेल्या दोन दिवसांपासून कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. २१ जूनच्या रात्री चाचणीतील अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला.