‘मुसलमानांना एक घंटा द्या, एकही हिंदुत्वनिष्ठ जीवंत रहाणार नाही, याची मी निश्‍चिती देते !’

इस्लामी संघटना ‘एस्.डी.पी.आय.’ च्या महिला नेत्या जन्नत अलिमा यांची हिंदुत्वनिष्ठांना धमकी

उजवीकडे ‘एस्.डी.पी.आय.’च्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा जन्नत अलिमा

तिरुनेलवेली (तमिळनाडू) – मुसलमानांना एक घंटा द्या. एकही हिंदुत्वनिष्ठ (संघ, भाजप, हिंदु मुन्नानी, विहिंप यांचे कार्यकर्ते) जीवंत रहाणार नाही याची मी निश्‍चिती देते, अशा शब्दांत इस्लामी संघटना ‘एस्.डी.पी.आय.’च्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा जन्नत अलिमा यांनी हिंदूंना धमकी दिली. नूपुर शर्मा यांच्या विरोधात तिरुनेलवेली शहरातील पेट्टाई येथे आयोजित केलेल्या एका सभेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे पुरेसे सामर्थ्य आणि शक्ती आहे. आम्ही एका घंट्यात मुसलमान भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठांना ठार मारण्यास सिद्ध आहेत.’’

अधिवक्ता कुत्रालनाथन् यांच्याकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

अशी तक्रार का प्रविष्ट करावी लागते ? पोलीस स्वतःहून अशांवर कारवाई का करत नाहीत ?

‘हिंदु मुन्नानी’चे राज्य सचिव अधिवक्ता कुत्रालनाथन् यांनी जन्नत अलिमा यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. जन्नत अलिमा यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘एस्.डी.पी.आय.’ आधीच हत्यांच्या खटल्यांचा सामना करत आहे. अलिमा यांच्या धमकीतून ‘एस्.डी.पी.आय.’चे आतंकवादी संघावर आक्रमण करण्यासाठी सिद्ध असल्याचे उघड होते. तमिळनाडूमध्ये कुठलाच अनूचित प्रकार घडू नये, यासाठी या इस्लामी संघटनेची कसून चौकशी करण्यात यावी.’’

संपादकीय भूमिका 

  • यापूर्वी अकबरूद्दीन ओवैसी यांनीही ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, आम्ही ७५ कोटी हिंदूंना संपवू’, अशा आशयाची धमकी दिली होती. आता जन्नत अलिमा यांनीही अशाच प्रकारची धमकी दिली आहे. यावरून अशा मुसलमान नेत्यांची हिंदूंना संपवण्याची किती सिद्धता आहे, हे स्पष्ट होते ! समाजात फूट पाडणार्‍या अशा संघटनेवर सरकारने तात्काळ बंदी आणली पाहिजे !
  • याविषयी पुरोगामी, नास्तिक, साम्यवादी, प्रसारमाध्यमे काही बोलत का नाहीत ?
  • असे झाल्यास किती हिंदू या संकटाला तोंड द्यायला सिद्ध आहेत ? हिंदू आता तरी संघटित होतील का ?
  • हिंदूंचे नेते वारंवार ‘हिंदु-मुसलमान भाऊ भाऊ’च्या घोषणा देतात, तर मुसलमान नेते वारंवार हिंदूंना संवपवण्याची धमकी देतात ! आता तरी अशा हिंदु नेत्यांचे डोळे उघडतील का ?