पुणे जिल्ह्यातील १ सहस्र ३८५ अंगणवाड्या अंधारात !

अंगणवाड्यांमध्ये प्राथमिक सुविधाही कशा नाहीत ? शासनाने दिलेला निधी जातो कुठे ? असा प्रश्न सामान्यांना पडल्यास चूक काय ?

९१ लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा शासनाधिन !

लाखो रुपयांचा मद्यसाठी सापडणे, हे सुरक्षायंत्रणेचे अपयश नव्हे का ?

विशाळगडाच्या पायथ्याशी ‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभु देशपांडे झालेल्या अभिनेत्याने घर बांधले !

अभिनेते अजय पूरकर यांनी केवळ चित्रपटात बाजीप्रभु साकारले नाहीत, तर त्यांचा झंझावात ते खर्‍या अर्थाने जगत आहेत ! समाजासमोर राष्ट्रभक्तीचा आदर्श ठेवणार्‍या अजय पूरकर यांची कृती अभिनंदनीय आहे !

उंबरे (खालापूर) आणि पाणदिवे (उरण) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

रायगड जिल्ह्यात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांतून प्रेरणा घेऊन उंबरे (ता. खालापूर) आणि पाणदिवे (ता. उरण) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघांताविरोधात लढा देऊन संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार धर्मप्रेमींनी केला.

महाराष्ट्रात गौरवशाली इतिहास पर्वतरांगांवर कोरण्यात येणार !

महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पर्वतरांगांवर इतिहास जतन करण्याची ही अनोखी संकल्पना मांडली आहे. ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रकल्पाची व्यवहार्यता पडताळणे, तसेच सविस्तर आराखडा सिद्ध करण्यासाठी सल्लागार नेमणे हे निर्णय घेतले आहेत.

वारकर्‍यांसाठीच्या ‘पंढरीची वारी’ या ‘ॲप’चे २१ जून या दिवशी होणार लोकार्पण !

वारकर्‍यांना गर्दीच्या काळात साहाय्य व्हावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रथमच ‘पंढरीची वारी’ हे भ्रमणभाषवरील ‘अ‍ॅप’ सिद्ध केले आहे. त्यावर वारीच्या काळात प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर येथे येणारे वारकरी यांना पुरवण्यात येणार्‍या सुविधांची माहिती मिळेल.

वाहतूक पोलिसांना रात्रपाळीतही काम करावे लागणार ! – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा आदेश !

शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वाहनांची वर्दळ कायम रहात असल्याने मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीचे नियोजन करा, अशी सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

राज्यात दहावीचा निकाल ९६.९४ टक्के !

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वांत अल्प लागला. यंदाही निकालात मुलीच पुढे आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे.

अल्पवयिनांमधील हिंसकता !

‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !

रांजणगाव (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच घेतांना अटक !

लाच घेणारे पोलीस निरीक्षक कायद्याचे राज्य कसे आणणार ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !