रायगड (वार्ता.) – रायगड जिल्ह्यात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांतून प्रेरणा घेऊन उंबरे (ता. खालापूर) आणि पाणदिवे (ता. उरण) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघांताविरोधात लढा देऊन संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार धर्मप्रेमींनी केला. सभांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी मार्गदर्शन केले.
उंबरे (खालापूर) येथील सभेचा आरंभ धर्मप्रेमी श्री. गोविंद साळुंखे, श्री. अशोक खोपडे, समितीचे श्री. प्रसाद वडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. पाणदिवे (ता. उरण) येथील सभेचा आरंभ ह.भ.प. शिवकर महाराज केळवणे, माजी उपनगराध्यक्ष श्री. रमेश ठाकूर आणि समितीचे श्री. प्रसाद वडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. सभांनंतर नियमितपणे धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी उपस्थित धर्मप्रेमी आणि गावकरी यांनी केली.