विशाळगडाच्या पायथ्याशी ‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभु देशपांडे झालेल्या अभिनेत्याने घर बांधले !

अजय पूरकर यांनी बांधलेले घर 

पुणे – शूरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रम यांची यशोगाथा ‘पावनखिंड’मध्ये दाखवण्यात आली आहे. ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये अभिनेते अजय पूरकर यांनी बाजीप्रभु देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. बाजीप्रभु देशपांडे यांची भूमिका ते प्रत्यक्षात जगले. अजय यांना इतिहासाचे प्रचंड वेड आहे; म्हणूनच की काय त्यांनी ज्या भूमीत पावनखिंडची लढाई झाली, त्याच भूमीत विशाळगडाच्या पायथ्याशी त्यांचे घर बांधले आहे. ‘ज्या मातीत इतिहास घडला, बाजीप्रभु यांनी आपल्या जिवाची बाजी लावली, त्याच मातीत आपले एखादे घर असावे’, असे अजय यांचे स्वप्न होते. ते स्वप्न आता खर्‍या अर्थाने सत्यात उतरले आहे. अजय यांच्या या नव्या घराची काही छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहेत.

संपादकीय भूमिका 

अभिनेते अजय पूरकर यांनी केवळ चित्रपटात बाजीप्रभु साकारले नाहीत, तर त्यांचा झंझावात ते खर्‍या अर्थाने जगत आहेत ! समाजासमोर राष्ट्रभक्तीचा आदर्श ठेवणार्‍या अजय पूरकर यांची कृती अभिनंदनीय आहे !