मुंबई – महाराष्ट्र, तसेच शूरवीर, महापुरुष आणि नेते यांचा गौरवशाली इतिहास राज्यातील विविध पर्वतरांगांवर शिल्पाच्या रूपात मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (‘एम्.एस्.आर्.डी.सी.’ने) पर्वतरांगांवर इतिहास जतन करण्याची ही अनोखी संकल्पना मांडली आहे. ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रकल्पाची व्यवहार्यता पडताळणे, तसेच सविस्तर आराखडा सिद्ध करण्यासाठी सल्लागार नेमणे हे निर्णय घेतले आहेत. यासाठी नुकत्याच निविदा मागवण्यात आल्या आहेत.
जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन या चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भव्य शिल्पे दक्षिण डकोटा राज्यातील पर्वतरांगांवर कोरण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचा इतिहास सांगणारी शिल्पे आता पर्वतरांगांवर कोरण्यात येणार आहेत.