रांजणगाव (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच घेतांना अटक !

सौजन्य : पोलीसनामा संकेतस्थळ

पुणे – रांजणगाव येथील एका आस्थापनाकडे कराराप्रमाणे थकीत असलेली रक्कम मिळवून देण्याकरता आणि आस्थापनाशी असलेला करार चालू ठेवण्याकरता तक्रारदाराच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रांजगणाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास कारंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • लाच घेणारे पोलीस निरीक्षक कायद्याचे राज्य कसे आणणार ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !