९१ लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा शासनाधिन !

नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाची धडक कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

नीरा (ता. पुरंदर) – येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत विदेशी मद्याचा साठा ६६ लाख रुपयांची तस्करी करण्यात येत असलेल्या मद्यासह ९१ लाख ७७ सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल शासनाधिन केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे अधीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अन्वये पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या हद्दीत नीरा लोणंद रस्त्यावरील हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रस्त्यावर मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजले. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क पथकाने सापळा रचून ट्रक पकडून त्यामध्ये असलेला विदेशी मद्यसाठा कह्यात घेतला. ट्रकचालक प्रवीण पवार (वय २३ वर्षे) यालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका

  • लाखो रुपयांचा मद्यसाठी सापडणे, हे सुरक्षायंत्रणेचे अपयश नव्हे का ?