पाकवर दबाव आणण्यासाठी चीनचे माजी परराष्ट्रमंत्री पाकच्या दौर्‍यावर !

पाकमध्ये चिनी सुरक्षारक्षक तैनात करण्याचे प्रकरण

इस्लामाबाद – पाकिस्तान आणि चीन या देशांच्या आर्थिक महामार्गाचे काम करणार्‍या पाकमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी चीन पाकवर दबाव आणत आहे. गेल्या काही मासांपासून पाकमध्ये अनेक चिनी कामगारांच्या हत्या झाल्या आहेत. त्यासाठी चीन पाकमध्ये चिनी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी करत आहे. यासाठी चीनचे माजी परराष्ट्रमंत्री यांग जिइची हे इस्लामाबादच्या दौर्‍यावर आले आहेत.

१. चीनच्या मागणीला पाकच्या गृहमंत्रालयाने तीव्र विरोध दर्शवल्याने यावर मार्ग काढण्यासाठी यांग जिइची हे पाकमध्ये आले आहेत.

२. सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीच्या माध्यमातून पाकच्या संप्रभुतेचे उल्लंघन करण्याचाच चीनचा प्रयत्न आहे, असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

३. यांग जिइची म्हणाले की, चीन पाकिस्तानला प्रत्येक स्तरावर राजकीय साहाय्य करील.

४. या सगळ्यामध्ये पाकिस्तानी आतंकवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा प्रमुख नूर वली मेहसूद याने म्हटले की, त्याची संघटना चिनी नागरिकांवर आक्रमण करत नसून पाक सैन्याचीच गुप्तचर संघटनाच ही आक्रमणे करत आहे.