अमेरिकेकडून फिनलंड आणि स्वीडन यांना ‘नाटो’चे सदस्य बनण्याचे निमंत्रण

वॉशिंगटन – युक्रेन-रशिया युद्ध चालू असतांनाच ‘नाटो’ ने फिनलंड आणि स्वीडन  यांना ‘नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ अर्थात् ‘नाटो’ संघटनेचे सदस्य बनण्याचे निमंत्रण दिले आहे.


याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले, ‘आम्हाला युक्रेन संदर्भात आहे, तशी समस्या फिनलंड आणि स्वीडन यांच्या संदर्भात नाही. दोन्ही देशांना ‘नाटो’ मध्ये सहभागी व्हायचे असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करतो. तथापि ते जर ‘नाटो’मध्ये सहभागी झाले, तर आमच्या संबंधात थोडा तणाव निर्माण होईल.’