बेंगळुरू येथे हिंदु संघटनांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्रालयाला जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून निवेदन  

उदयपूर (राजस्थान) येथील कन्हैयालाल यांच्या हत्येचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून उदयपूर (राजस्थान) येथील कन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्रालयाला देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, राजस्थानमधील काँग्रेसच्या लांगूलचालनाचा हा परिणाम आहे. हिंदूंच्या अस्तित्वाच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने ही प्रकरणे अत्यंत गांभीर्याने घेऊन राजस्थानच्या हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले राजस्थान सरकार विसर्जित करावे.

या वेळी श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर, हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. सुरेश जैन, कन्नन सुब्रमणी, अधिवक्ता डी.सी. गंगाधर आणि अधिवक्ता डी.पी. प्रसन्ना, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा आदी उपस्थित होते.