कन्हैयालाल यांच्याप्रमाणे नूपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने नितीन जैन यांच्याही हत्येचा कट

दहशतीमुळे जैन कुटुंबियांनी उदयपूर सोडले !

प्रतीकात्मक छायाचित्र

उदयपूर (राजस्थान) – येथे शिवणकाम करणारे कन्हैयालाल यांना नुपूर शर्मा यांची समर्थन करणार्‍या पोस्टवरून जिहाद्यांनी क्रूरपणे हत्या केली, तशीच हत्या येथे नितीन जैन यांची करण्याचा कट रचण्याचा संशय आल्याने जैन यांचे कुटुंबीय उदयपूर सोडून गेले आहेत. नितीन जैन यांनीही सामाजिक माध्यमांतून नूपुर शर्मा यांच्या समर्थन केले होते.

१. कन्हैयालाल यांची हत्या केल्यानंतर आरोपी रियाज याने व्हिडिओद्वारे अशा प्रकारे अन्य लोकांची हत्या करण्यासाठी मुसलमानांना चिथावले होते. त्यात त्यांनी सेक्टर ११ मधील व्यक्तीचा उल्लेख केला होता. ही व्यक्ती म्हणजे नितीन जैन हेच असल्याचे सांगितले जात आहे. नितीन जैन हे ३५ वर्षांचे असून त्यांचा टायरचा व्यवसाय आहे. जैन यांच्या वडिलांनी सांगितले की, नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याने त्यांच्या विरोधाही पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती.

२. काही जण ९ जून या दिवशी जैन यांच्या टायरच्या दुकानात त्यांची चौकशी करण्यासाठी आले होते. त्या वेळी जैन दुकानात उपस्थित नव्हते. १६ जूनलाही काही जण त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हापासून जैन यांनी दुकानात जाणे बंद केले होते आणि आता कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर त्यांनी उदयपूर सोडले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंना वेचून ठार मारण्याच्या जिहाद्यांना आता मुळासह नष्ट करण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !