श्रीलंकेतील प्रांतीय निवडणुका होण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा !

श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांच्या राजकीय पक्षांची मागणी

कोलंबो – श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांच्या राजकीय पक्षांच्या एका समुहाने भारताकडे आग्रह धरला आहे की, त्याने श्रीलंकेतील ९ प्रांतांमधील प्रलंबित निवडणुका होण्यासाठी हस्तक्षेप करावा. यासाठी भारताने राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांवर दबाव आणण्याचीही मागणी त्यांनी केली.

वर्ष २०१८ मध्ये झालेल्या एका कायदेशीर कारवाईमुळे या निवडणुका प्रलंबित असून तेथील प्रांतीय परिषदा स्थगित आहेत. यासाठी तमिळ अल्पसंख्यांकांच्या राजकीय पक्षांनी भारतीय उच्चायुक्तांची भेट घेऊन वरील मागणी केली.