पुणे रेल्वेस्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी

पुणे – पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला २९ जून या दिवशी सकाळी ‘पुणे रेल्वे स्टेशन’ ८ दिवसांत बाँबने उडवून देण्याच्या धमकीचा दूरभाष आला. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा बल (आर्.पी.एफ्.), श्‍वानपथक, बाँबशोधक पथक आणि पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे; परंतु हा खोडसाळपणा असण्याची शक्यता आहे. (असा खोडसाळपणा करणार्‍या संबंधिताला कह्यात घेऊन त्याला कठोर शिक्षा केल्यासच पुन्हा असे करण्यास कुणी धजावणार नाही ! – संपादक)

मे मासातही पुणे रेल्वेस्थानक बाँबने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यासमवेत आरोपींनी पैशांची मागणीही केली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने अन्वेषणाला लागली होती. या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली होती; मात्र खोडसाळपणा म्हणून हा दूरभाष आल्याचे समोर आले होते. त्यामुळे हाही प्रकार खोडसाळपणाने केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.