नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले

नेपाळच्या तारा एअरलाइनच्या बेपत्ता झालेले विमान अपघातग्रस्त होऊन त्यातील सर्व २२ प्रवासी आणि कर्मचारी यांचा मृत्यू झाला. या विमानाचे अवशेष नेपाळमधीलच हिमालय पर्वतांमध्ये सापडले आहेत.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार !

पुलवामा येथील गुंडीपोरा भागात २९ मेच्या रात्री झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना ठार केले.

देशातील सर्व १०० वर्षे जुन्या मशिदींचे गोपनीय सर्वेक्षण करावे !

देशातील १०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या मशिदींचे सर्वेक्षण पुरातत्व किंवा अन्य विभागांकडून करण्यात यावे. यातून तेथे हिंदु, शीख, बौद्ध किंवा जैन यांच्या धार्मिक स्थळांचे अवशेष आहेत का ? हे उघड होईल, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

बेळगाव येथील ‘हिंदू एकता दिंडी’ म्हणजे भाव, चैतन्य आणि क्षात्रतेज यांचा अपूर्व संगम !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

वास्को येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

संशयित नसीम महंमद याने पीडितेचे अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ‘गोवा बाल कायदा’, ‘पॉक्सो’ आणि भारतीय दंडसंहितेचे कलम ३७६ (३) अंतर्गत गुन्हा नोंदवून संशयित नसीम महंमद याला कह्यात घेतले.

वेंगुर्ला शहरात चालणार्‍या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घाला ! – वेंगुर्लावासियांचे पोलिसांना निवेदन

असे निवेदन का द्यावे लागते ? अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात कसे येत नाही ? कि माहिती असूनही ‘आर्थिक’ लाभासाठी दुर्लक्ष केले जाते ? असा प्रश्न जनतेला पडतो !

पास्टर डॉम्निक याच्या विरोधात अन्वेषण चालूच रहाणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

उठसूठ कुठल्याही प्रकरणात हिंदु संतांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांच्याविरोधात सातत्याने गरळकओक करणारी प्रसारमाध्यमे हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या पाद्र्याच्या कृतीविषयी अवाक्षरही काढत नाहीत !

ईश्‍वरी राज्यातील जनता कशी असेल ?

‘ईश्‍वरी राज्यातील जनता त्या त्या सणाला अनुरूप अशी साधना करील. सुट्टी मिळाली म्हणून मजा करायला जाणार नाही.’