काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार !

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथील गुंडीपोरा भागात २९ मेच्या रात्री झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना ठार केले. या आतंकवाद्यांना शोधण्यासाठी येथे सुरक्षादलांनी वेढा घातला होता. त्या वेळी ही चकमक उडाली. ठार झालेले आतंकवादी जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचे आहेत.