नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले

मृतांमध्ये ठाण्यातील ४ प्रवाशांचा समावेश

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या तारा एअरलाइनच्या बेपत्ता झालेले विमान अपघातग्रस्त होऊन त्यातील सर्व २२ प्रवासी आणि कर्मचारी यांचा मृत्यू झाला. या विमानाचे अवशेष नेपाळमधीलच हिमालय पर्वतांमध्ये सापडले आहेत. हे विमान नेपाळच्या पोखरा येथून जोमसोमला जात होते. अपघातग्रस्त विमान ३० वर्षांहून अधिक जुने असल्याची माहिती समोर आली आहे. मृत २२ प्रवाशांमध्ये ठाण्यातील वैभवी बांदेकर-त्रिपाठी आणि अशोक कुमार त्रिपाठी या दांपत्यासह त्यांची मुले धनुष अन् रितिका यांचा समावेश आहे.