ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा !
इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणासाठी २५ मे या दिवशी भाजपने मंत्रालयावर मोर्चा काढला. नरीमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या येथून मोर्च्याला प्रारंभ झाला. काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा अडवल्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिय्या आंदोलन केले.