नेत्यांची धरपकड !
मुंबई – इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणासाठी २५ मे या दिवशी भाजपने मंत्रालयावर मोर्चा काढला. नरीमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या येथून मोर्च्याला प्रारंभ झाला. काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा अडवल्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिय्या आंदोलन केले. या मोर्च्यात भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर आदी नेत्यांसह अन्य पदाधिकार्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.