नाशिक येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींची आयात आणि विक्री यांवर बंदी !

थील गोदावरीसह नद्यांचे वाढते प्रदूषण लक्षात घेता महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी केंद्रशासन, तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शहरात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ (‘पीओपी’) पासून निर्मिती होणार्‍या सर्व प्रकारच्या मूर्तींची निर्मिती, आयात, साठा आणि विक्री यांवर बंदी घातली आहे..

गोरबंजारा धर्मपिठाचे १०० संत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार कारवाईची मागणी !

गोरबंजारा धर्मपिठाच्या कंठवली येथे बांधण्यात येणारे शक्तीपीठ मंदिराच्या परिसरातील भक्तनिवास अनधिकृत ठरवून सिडकोने पाडून टाकले. या प्रकरणी बंजारा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

नेहरू यांनी ब्रिटिशांचे ‘बी टीम’ म्हणून काम केले ! – आमदार अतुल भातखळकर, भाजप

चीनच्या आक्रमणाच्या वेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेकडून विमाने आणि पायलटही मागवले. यावरून नेहरू यांची देशाच्या संरक्षणाविषयीची आस्था (?) दिसून येते. नेहरू यांनी ब्रिटिशांची ‘बी टीम’ म्हणून काम केले, असे गंभीर वक्तव्य भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

मुंबईमध्ये दुचाकीवरील दोघांनीही शिरस्त्राण घालणे बंधनकारक !

मोटार वाहन नियमानुसार दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती यांना शिरस्त्राण वापरणे बंधनकारक आहे. मुंबईमध्ये या नियमाची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. सध्या याविषयी पोलीस जनजागृती करत असून प्रत्यक्ष कारवाई १५ दिवसांनी चालू करण्यात येणार आहे.

नगर येथे हिंदु एकजुटीचा आविष्कार दर्शवणारी सनातनची ‘हिंदू एकता दिंडी’ पार पडली !

‘इस्कॉन’ संप्रदायाचे गिरीवरधारीदास प्रभु यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून आणि नंतर ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजाला पुष्पमाळ अर्पण करून गांधी मैदान येथून दिंडीला प्रारंभ झाला. पौरोहित्य सर्वश्री उपेंद्र खिस्ती आणि नरेंद्र खिस्ती यांनी केले.

इंदूर (तेलंगाणा) येथे झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’ला वारकरी, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिंडीच्या प्रारंभी ध्वजाचे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिंडीच्या शेवटी नंदीपेट येथील श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज आणि सनातनच्या सौ. विनुता शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शिवसेना नेते यशवंत जाधव यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स !

शिवसेना नेते यशंवत जाधव यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावला आहे. ‘फेमा’ कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी त्यांना हा समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये जाधव यांच्या विदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

जोशपूर्ण घोषणांनी हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून दुमदुमली सांगली नगरी !

श्री गणेशाच्या पावन नगरी सांगलीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २५ मे या दिवशी हिंदू एकता दिंडी काढली गेली.

श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान धार्मिक विधी बंद करून व्यावसायिकपणा करत आहे ! – भोपे पुजारी मंडळाचा आरोप 

तत्कालीन निजाम सरकारने वर्ष १९०९ मध्ये मंदिर प्रशासनासाठी बनवण्यात आलेल्या देऊळ कवायत नियमावलीचा आता सोयीस्कररित्या चुकीचा अर्थ काढून मंदिर संस्थान शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा, देवी भक्तांचे कुलधर्म कुलाचार बंद करत आहे.

‘मंकीपॉक्स’विषयी मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृतीस प्रारंभ !

‘मंकीपॉक्स’ या आजाराच्या संदर्भात मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू केली आहे. मुंबई विमानतळावर परदेशातून येणार्‍या प्रवाशांची पडताळणी केली जात आहे. ‘मंकीपॉक्स’ हा विषाणूजन्य झुनोटिक रोग असून तो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटीबंधीय भागात आढळतो.