विद्यापिठात होणारे दीक्षांत सोहळे मराठमोळ्या पद्धतीने होणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

नागपूर – इंग्रज गेले, आता आपण आपली प्रथा चालू करू. विद्यापिठात होणारे दीक्षांत सोहळे उत्साहाने भरलेले असायला हवेत. तरुणांच्या कलाने कार्यक्रम व्हायला हवा. तुमचा वेतन आयोग माझ्या दृष्टीने गौण आहे. विद्यार्थी महत्त्वाचा आहे. त्यांना काय हवे, याचा विचार होणार कि नाही ? त्यामुळे दीक्षांतची ही प्रथा पालटायला हवी. ब्रिटीशकालीन दीक्षांत समारंभाची पद्धत बंद करून पुढील वर्षांपासून मराठमोळा पदवी प्रदान दीक्षांत सोहळा होईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे केली. राजनगर येथील राष्ट्रीय अग्नीशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहात शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ २४ मे या दिवशी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, दीक्षांत सोहळ्याचा वेळ अल्प करणे आवश्यक आहे. दीक्षांत समारंभ पुष्कळ लांबलचक आणि कंटाळवाणे होतात. दीक्षांत समारंभांमध्ये विद्यार्थ्यांनी काय करावे ?, याचे मार्गदर्शन करणारे राजकारणविरहित लोक आणि मंडळी व्यासपिठावर हवी. विद्यार्थ्यांनी आता ‘ऑफलाईन’ परीक्षापद्धती स्वीकार करणे आवश्यक आहे.