धर्मांतराला प्रोत्साहन देणाऱ्या ‘कॉन्व्हेंट शाळां’वर कारवाई करा ! – किशोर घाटगे, शिवसेना

देशभरातील अनेक ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये जाणीवपूर्वक हिंदु विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना शिक्षा देण्याचे प्रकार होतात. त्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते. या शाळा केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असल्याने त्या राज्यशासनास जुमानत नाहीत.

बेळगाव येथे ‘हिंदू एकता दिंडी’त धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे २३ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली.

संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

हा मोर्चा भाजपचा नसून यात तमाम संभाजीनगरवासीय सहभागी आहेत. त्यामुळे संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ऑस्ट्रेलियातील ‘हवामान’ निवडणूक !

‘आम्हाला मत दिल्यास विनामूल्य गहू, तांदूळ देऊ’, ‘रस्ता बांधून देऊ’, ‘नोकर्‍या देऊ’, अशी आश्वासने ऐकण्याची सवय असलेल्या भारतियांना हे वाचून थोडे अवघडल्यासारखे वाटेल. ‘पर्यावरण वाचवा’, किंवा ‘हवामान पालटामुळे होणारे दुष्परिणाम’ या सूत्रावर निवडणूक, हे आपल्या पचनी पडणे जरा कठीणच !

मुलाला कामावरून काढल्याच्या रागात वडिलांनी रुग्णालय फोडले !

खासगी रुग्णालयात ३-४ जणांच्या टोळीने रुग्णालयावर आक्रमण करत तोडफोड केली. यामध्ये रुग्णालयाची पुष्कळ हानी झाली आहे.

सांगली शहर ‘यलो सिटी ब्रँडिंग’ करण्याचे निश्चित !

सांगलीच्या हळदीचा पिवळा रंग अतिशय उच्च आहे. याच हळदीवरून सांगली शहर ‘यलो सिटी ब्रँडिंग’ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेनुसार सांगली महापालिकेच्या इमारतींपासून या मोहिमेस प्रारंभ होणार आहे.

मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महावितरण’चा लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत !

अशा लाचखोरांना कठोर शिक्षा झाल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील तालेरा रुग्णालयात आग !

अग्नीशमनदलाच्या जवानांनी काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा ‘कौशल्य विकास योजना पुरस्कार’ घोषित !

कौशल्य विकासाच्या संदर्भात उल्लेखनीय काम केल्याने सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा ‘कौशल्य विकास योजना पुरस्कार’ जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.