मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महावितरण’चा लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – मंचर (जिल्हा पुणे) येथे विजेचा खांब पालटून देण्यासाठी ३ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महावितरण आस्थापनाचे कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा लाचखोरांना कठोर शिक्षा झाल्याविना इतरांवर जरब बसणार नाही ! – संपादक)