पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील तालेरा रुग्णालयात आग !

पिंपरी-चिंचवड (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात २१ मेच्या दुपारी साडेचार वाजता इमारतीच्या तळघरामध्ये आग लागली. ही आग ‘इन्व्हर्टर’च्या बॅटरीमध्ये लागली होती. त्यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. वेळीच सर्वांनी बाहेर, सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. अग्नीशमनदलाच्या जवानांनी काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.