नवी मुंबई (उलवे) येथे उभारणार तिरूपतीचे भव्य मंदिर !

ज्या भक्तांना आंध्रप्रदेश येथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी (उलवे) नवी मुंबई येथे भव्य तिरूपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच १० एकर जागेवर हे मंदिर उभारण्यात येणार आहे.

गोव्यात ठिकठिकाणी हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी सामूहिक गुढीपूजन आणि शोभायात्रा यांचे आयोजन

राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग

मुलुंड (मुंबई) येथे ‘साधना सत्संग शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले !

सद्गुरु आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीत मुलुंड येथे २९ मार्च या दिवशी ‘साधना सत्संग शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुलुंड येथील ‘मुलुंड सेवा संघा’च्या सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील ‘डीटीडीसी’ कुरिअर कार्यालयात आले लुधियानाहून घातक शस्त्रांचे पार्सल !

राज्यात तलवारींचे पार्सल मिळण्याच्या घटना वारंवार घडणे चिंताजनक आहे. पोलिसांनी तत्परतेने यामागे कुणाचा हात आहे, हे शोधूण काढणे आवश्यक आहे.

गोवा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले खातेवाटप

शपथविधी कार्यक्रमानंतर अखेर ६ दिवसांनी खातेवाटप करण्यात आले. राज्यपालांच्या संमतीनंतर खातेवाटपाची अधिसूचना प्रसिद्ध केली. अजून तिघांचा मंत्रीमंडळात समावेश व्हायचा आहे. आता सर्वांचे लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

धर्माभिमान्यांचा हिंदु राष्ट्राच्या धर्मकार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

नागपूर येथे दोन दिवसांच्या ‘हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळेचे आयोजन !

हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु राष्ट्र’रूपी गोवर्धन पर्वताला काठ्या लावून खारीचा वाटा उचलावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील अंबर सभागृहात आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. ३ एप्रिल या दिवशी झालेल्या या अधिवेशनात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

श्रीलंकेतील आणीबाणी !

अर्थव्यवस्था देशाबाहेरील गोष्टींवर अवलंबून असल्यास काय हाल होऊ शकतात ? हेसुद्धा श्रीलंकेच्या उदाहरणातून दिसते. चीनसारख्या धूर्त आणि कपटी देशाकडून कर्ज घेतल्यास भोगावे लागणारे दुष्परिणामही दिसतात. यातून भारताने बोध घ्यावा. एकूणच राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून आर्थिक धोरणे आखल्यास श्रीलंकेसारखी वाईट परिस्थिती येणार नाही, हे निश्चित !

वायफड (जिल्हा धुळे) येथील सरपंचांना मारहाण

या प्रकरणी राऊत यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी आरोपी बावणे याला अटक केली आहे.

आदर्श समाजासाठी धर्मशिक्षणच हवे !

शिक्षक मुलांच्या जीवनात गुरु असतात आणि ते विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्यासह मार्गदर्शन करतात. या जगात गुरु-शिष्य हे नाते सर्वांत पवित्र मानलेले आहे; पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेतील शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करावी लागत आहे. याहून समाजाचे दुसरे अधःपतन काय असू शकते ? अशी वेळ का आली ?