धर्माभिमान्यांचा हिंदु राष्ट्राच्या धर्मकार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

नागपूर येथे दोन दिवसांच्या ‘हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळेचे आयोजन !

नागपूर, ३ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागपूर येथे २६ आणि २७ मार्च या कालावधीत दोन दिवसांच्या ‘हिंदु संघटक’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्राच्या धर्मकार्यात सहभागी होण्याचा निर्धार केला. कार्यशाळेचे उद्घाटन धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी पू. पात्रीकर यांनी ‘साधना म्हणून धर्मप्रसार करण्याचे महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये गटचर्चा घेण्यात आली. कार्यशाळेची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने झाली. या कार्यशाळेचा अनेक धर्माभिमान्यांनी लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. कार्यशाळेच्या ठिकाणी सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

२. कार्यशाळेच्या ठिकाणी क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले.

३. काही शिबिरार्थी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

धर्माभिमान्यांचे मनोगत

१.  सौ. नंदा पांडे, शिक्षिका, छिंदवाडा, मध्यप्रदेश – कार्यशाळेत असतांना पुष्कळ आनंद मिळाला. तो सतत मिळण्यासाठी मी झोळीत भरून घेऊन जात आहे.

२. सौ. मंजुषा पिंपळापूर, नागपूर – अशा शिबिरांमुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास आणि कौशल्यवृद्धी होते. त्यामुळे अशी शिबिरे वारंवार व्हायला हवीत. यातूनच हिंदु संघटक घडून हिंदु राष्ट्र लवकर येईल.

३. श्री. रवींद्र भोंदेकर, तिरोडा – या शिबिरामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी जोमाने प्रयत्न करण्याची इच्छा निर्माण झाली.