नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेचा ३३ वा वर्धापनदिन समारंभ १ जानेवारी ऐवजी ७ जानेवारी या दिवशी होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे केंद्रशासनाने २६ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत ‘राष्ट्रीय दुखवटा’ घोषित केला आहे. त्या अनुषंगाने वरील निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचा हा ३३ वा वर्धापनदिन असणार आहे. वाशी येथील महापालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून शहराच्या सर्वांगीण विकासाकरता सदैव प्रयत्नशील राहून काम करणारे अधिकारी/कर्मचारी यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांच्यामध्ये कौटुंबिक जिव्हाळा साधला जावा, या दृष्टीने प्रत्येक वर्षी १ जानेवारी या दिवशी वर्धापनदिनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. ‘