घरपट्टी वाढीविषयी पालिका आणि नगरपंचायती यांना आदेश !

सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील प्रकरण ९ अंतर्गत विहित वेळेत फेरआकारणी करावी, असे आदेश सातारा जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, घरपट्टीवाढीविषयीचे आदेश कार्यालयीन आणि आर्थिक शिस्तीस अनुसरून आहेत. त्यामुळे घरपट्टी वाढीविषयीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.