पुण्यात अल्पवयीन विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग; प्रसाधनगृहात भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण !

विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करण्यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही. ढासळलेल्या समाजातीची नीतीमत्ता उंचावण्यासाठी शाळेतूनच धर्मशिक्षण द्यायला हवे.

एल्.टी.टी.-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरले !

नाशिक येथे एल्.टी.टी.-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे ३ एप्रिल या दिवशी लहवित आणि देवळाली स्थानकांच्या दरम्यान दुपारी ३.१५ वाजता रूळावरून घसरले. मध्य रेल्वेच्या वतीने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने सोलापूर येथे देवतांच्या प्रतिमांचे विधीवत् अग्निविसर्जन !

गणपति मंदिराच्या बाहेर विविध लोकांनी घरातील देवतांच्या जुन्या प्रतिमा ठेऊन दिल्या होत्या. त्यामुळे देवतांची विटंबना होत होती.

देहू (पुणे) येथे १ एप्रिलपासून पुन्हा मांस आणि मच्छी विक्रीस बंदी, उल्लंघन केल्यास कारवाई !

देशातील प्रत्येक तीर्थस्थानी अशा प्रकारची बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा, असेच हिंदूंना वाटते.

चिनी रॉकेटचा भाग असण्याची शक्यता ! – खगोलतज्ञ

नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि राज्यात अन्य काही ठिकाणी आकाशातून ४ आगीचे गोळे वेगाने शेपटीच्या आकाराच्या प्रकाशासह खाली येतांना २ एप्रिलच्या रात्री ८ वाजता दिसले.

काँग्रेसच्या राज्यातील असुरक्षित हिंदू !

गुढीपाडव्याच्या दिवशी करौली (राजस्थान) येथे हिंदूंकडून काढण्यात आलेली दुचाकी फेरी मुसलमानबहुल भागातून जात असतांना तिच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात ३५ जण घायाळ झाले.

स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्रजांनी चालू केलेली न्यायालयांना सुट्या देण्याची प्रथा अजूनही चालू असणे आणि परिणामस्वरूप जनतेच्या न्यायदानाला विलंब होणे

‘इंग्रज न्यायमूर्तींनी वर्षभरातून अनुमाने दोनदा इंग्लंडला जाण्याचा शिरस्ता होता. त्यामुळे त्या कालावधीमध्ये भारतातील न्यायालये बंद असायची. तेव्हापासून न्यायालयांना दीर्घ कालावधीची सुट्टी देण्याची पद्धत चालू झाली.

उपासनेचे प्रकार

पूजा ही विविध प्रकारांनी केली जाते. त्यात स्वतःचे प्राप्त कर्तव्य म्हणून केलेले नित्यकर्म, पूजा, मंत्र, जप, होमहवन, नामसंकीर्तन, गीतगायन, वेदपारायण, पुराणवाचन, मंदिर सजवणे, मंदिरापुढे सडासमार्जन करणे, सुगंधी द्रव्यासह रांगोळ्या काढणे, दिव्याची आरास करणे इत्यादी अनेक प्रकारांनी स्वतःच्या उपास्यदेवतांची उपासना करता येते.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.

संतांचा मनोलय

‘संतांचा मनोलय झालेला असल्यामुळे त्यांना कधीच मनोविकार होत नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले