नवी मुंबई – ज्या भक्तांना आंध्रप्रदेश येथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी (उलवे) नवी मुंबई येथे भव्य तिरूपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच १० एकर जागेवर हे मंदिर उभारण्यात येणार आहे.
तिरूपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत तिरूमला तिरूपती देवस्थानला या मंदिरासाठी भूमी देण्याच्या निर्णय घेण्यात आला. तिरूपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी आणि मंत्री अदित्य ठाकरे हे या बैठकीत उपस्थित होते.
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यावरच तिरूपती बालाजीचे दर्शन पूर्ण होते, अशी धारणा आहे. त्यामुळे ही जागा मंदिरासाठी देणे, हे अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे.