सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात कर्तव्यावर असलेले सैनिक प्रकाश खरात यांना वीरमरण आले आहे. ३० डिसेंबर या दिवशी अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या बातमीमुळे कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावावर शोककळा पसरली. प्रकाश खरात हे वयाच्या १८ व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण करून केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले होते.
२० वर्षांच्या सेवा कालावधीमध्ये प्रामाणिकपणे सेवा करत ते ‘हेड कॉन्स्टेबल’ या पदापर्यंत पोचले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११६ बटालियनमध्ये ते अनंतनाग जिल्हा कारागृहात कार्यरत होते. प्रकाश खरात यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.