सांगली, १ जानेवारी (वार्ता.) – बामणोली कुपवाड भागातील जिल्हा परिषद शाळेत विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने कोठारी बंधूंनी अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी केलेल्या बलीदानाच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात ८३ जणांनी रक्तदान केले. रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास बजरंग दलाच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र-छावा’, हे पुस्तक आणि बजरंग दलाची दिनदर्शिका भेट देण्यात आली. या प्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. आकाश जाधव, सर्वश्री शुभम पाटील, चंद्रकांत सरगर, सरकार वारे, लक्ष्मण हुलवान, सौरभ गुरव यांसह अन्य उपस्थित होते.