चैत्र एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे २ लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन !
यंदा भाविकांचा मोठा उत्साह होता; मात्र वारीच्या नियोजनाच्या संदर्भात प्रशासनाचा ढिसाळपणा दिसून आला. येथील ६५ एकर क्षेत्रामध्ये भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी होती, तर शहरातील चौकाचौकांत बसवण्यात असलेले ‘वॉटर टँक’ बंद अवस्थेत आहेत.