नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

मुंबई – आय.एन्.एस्. विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचा मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर ‘सेव्ह विक्रांत’च्या नावे लोकांकडून गोळा केलेला साहाय्यनिधी योग्य कामासाठी वापरण्यात आला नसल्याचा आरोप आहे. हा निधी योग्य ठिकाणी न वापरला जाणे हे सोमय्या पिता-पुत्र यांचे उत्तरदायित्व होते आणि तेच यासाठी उत्तरदायी आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांना तपास करायचा असेल, तर ते करू शकतात, असेही न्यायालयाने सांगितले आहे. सोमय्या पिता-पुत्र जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत.