पुणे – खराडी येथील ‘कोठारी इंटरनॅशनल स्कूल’मध्ये एका ९ वर्षांच्या विद्यार्थ्याला ३ मासांचे शुल्क न भरल्याने खोलीमध्ये कोंडून ठेवण्याची घटना समोर आली आहे. ‘३ मासांचे ३० सहस्र रुपये होतात. हे पैसे ‘ऑनलाईन’ भरावे लागतात; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे भरता आले नाहीत. शाळेकडे माझे २५ सहस्र रुपये अनामत रक्कम असूनही माझ्या मुलाला डांबून ठेवले होते’, असा आरोप पालकांनी केला आहे.