शरद पवार यांच्या घरावर आक्रमण करणाऱ्या एस्.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय ! – अनिल परब, परिवहनमंत्री

परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई – शरद पवार यांच्या घरावर आक्रमण करणाऱ्या एस्.टी.च्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी परब म्हणाले की, अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी एस्.टी.च्या कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत. हे पैसे नेमके कुठल्या कामासाठी वापरले गेले ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सदावर्ते हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील आक्रमणासाठी उत्तरदायी असल्याचेही ते म्हणाले.

खर्च न्यून करण्यासाठी महामंडळाने येत्या वर्षभरात तीन सहस्र नवीन बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया चालू आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.