दंगली आणि हतबल पोलीस !

धर्मांधांच्या दंगली पूर्ण थांबण्यासाठी कठोर शिक्षेची कारवाई होणे, हाच पर्याय आहे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबईत वर्ष २०१२ मध्ये आझाद मैदान येथे झालेल्या दंगलीनंतर आता १० वर्षांनी १० एप्रिल या दिवशी परत एकदा धर्मांधांनी मानखुर्द येथे हातात तलवारी घेऊन हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस केले. अर्थातच हिंदु तरुणांना अडवून नियोजनबद्धरित्या त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. धर्मांधांकडे तलवारी होत्या आणि त्यांनी ‘सालो छोडेंगे नही काट डालेंगे’, अशी तीव्र द्वेषयुक्त धमकी दिली. या वेळी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देऊन त्यांनी हिंदु युवकांना मारहाण केली. एवढे होऊनही नेहमीप्रमाणेच पोलिसांनी प्रथम गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. मारहाण झालेल्या एका युवकाने पलायन केले आहे. दुसरा अत्यंत भयभीत आहे. पाच पातशाह्यांना ‘सळो कि पळो’ करून सोडणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राच्या राजधानीतील ही घटना आज ४०० वर्षांनंतरही तत्कालीन इतिहासाप्रमाणे घडतच आहे. ‘वारंवार हिंदूंवर आक्रमणे करणाऱ्या धर्मांधांवर पोलीस कडक कारवाई करत नाहीत’, हे छत्रपतींचा अभिमान बाळगणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांसाठी अत्यंत लज्जास्पद आहे. काहीही कारण नसतांना ‘धर्मांधांनी देशभर सतत कुठे ना कुठे हिंदूंवर नियोजनबद्ध आक्रमणे करत रहाणे’, ही आजही आढळणारी स्थिती केवळ आणि केवळ धर्मांधांना कठोर शासन होत नसल्यामुळेच आहे. आक्रमणकर्त्यांच्या मूळ स्रोतापर्यंत जाऊन त्याचा समूळ नायनाट करणे आणि आक्रमणकर्त्यांना कठोर शासन होऊन वचक बसणे, हाच त्यावरील उपाय आहे. राजस्थानमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काढलेल्या मिरवणुकीत झालेल्या दंगलीचे पडसाद अजून ताजे असतांना रामनवमीला ८ राज्यांत धर्मांधांनी दंगली केल्या. यावरून एम्.आय.एम्.पक्षाचे ‘बॅरिस्टर’ असद्दुदीन ओवैसी यांनी ‘हिंदूंच्या धर्मगुरूंनी त्यांना भडकावल्या’च्या बोंबा मारून हिंदूंच्या सहनशीलतेची परिसीमा पाहिली आहे. धर्मांधांची ही ‘गोबेल्स नीती’ (सतत खोटे बोलल्याने ‘तेच खरे आहे’, असे वाटणे) गंभीर आहे.

हतबल पोलीस यंत्रणा !

वरील घटनेत पोलीस गुन्हा नोंद करण्यासाठी ‘संबंधित हिंदु तरुणानेच तक्रार करावी’, म्हणून अडून बसले. जो हिंदु धर्मांधांच्या मारहाणीमुळे अत्यंत घाबरला आहे, त्याचे तक्रार देण्याचे धैर्य तरी होऊ शकते का ? अनेक प्रत्यक्षदर्शी या घटनेविषयी पोलिसांना सांगत असूनही पोलीस ऐकत नव्हते. ही पोलिसांनी गाठलेल्या असंवेदनशीलतेची परिसीमा नव्हे का ? अनेक घटनांमध्ये धर्मांधांची मजल पोलीस ठाणी जाळण्यापर्यंत जाते; इतकेच काय धर्मांधांनी भिवंडीत पोलिसांना जिवंत जाळले होते. धर्मांधांची उद्दाम आणि हिंदुद्वेष्टी मानसिकता ठाऊक असून, सर्व यंत्रणा हाताशी असून अन् हिंदूंवरील अन्याय स्पष्ट दिसत असतांनाही पोलीस गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करतात. ‘पोलीस कुणाच्या दबावाखाली असे वागतात ?’, याची दबक्या आवाजात सर्वत्र उघड चर्चा होतच असते. हिंदु पोलिसांमध्ये एवढा प्रखर धर्माभिमान निर्माण झाला पाहिजे की, त्यांच्या एकीचे बळ सर्व अयोग्य गोष्टींवर मात करणारे ठरले पाहिजे. ‘गोतस्करी’पासून ‘लव्ह जिहाद’पर्यंत सर्वच प्रकरणांत कायदे आणि साक्षीदार असूनही हिंदूंवरच गुन्हे नोंद करणे, त्यांनाच उलट धमकावणे, पर्यायच नसेल, तर धर्मांधांवर गुन्हे नोंद करून नंतर त्यांना समज देऊन सोडून देणे, हिंदूंनाच सामोपचाराचा उपदेश देणे अशा गोष्टी पोलीस करतात. आझाद मैदान दंगलीतील हानीभरपाईही रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या यंत्रणा अजून वसूल करू शकलेल्या नाहीत. अजूनही न्यायालयात या संदर्भातील खटले चालू आहेत. मानखुर्द येथील दंगलीच्या वेळी धर्मांधांनी अनेक रिक्शा आणि वाहने फोडली. हातावर पोट असणाऱ्या हिंदूंनी ही हानी कशी भरून काढायची ? मुंबईतील धारावीतील शोभायात्रेतही ‘हिंदूंची सत्य स्थिती सांगणाऱ्या’ हाती घेतलेल्या फलकांना पोलिसांनीच विरोध केला. ‘मुसलमानांची संख्या वाढल्यावर हिंदूंना कोणकोणत्या भागांतून विस्थापित व्हावे लागते’, याविषयीचा फलक पोलिसांनी झाकायला लावला. ‘वातावरण बिघडू नये’, म्हणून पोलीस हिंदूंना ती सांगू देत नाहीत; पण प्रत्यक्षात हिंदूंमध्ये ही जागृती नसल्यामुळेच धर्मांध वारंवार त्यांच्यावर आक्रमण करून वातावरण बिघडवत आहेत आणि धर्मांधांनी तसे केल्यावरही पोलीस परत हिंदूंनाच शांत रहायला सांगत आहेत. हे दुष्टचक्र आहे. पोलिसांचे असे वागणे, हे अन्याय करणाऱ्यांचे मूकसंमतीदार होण्याप्रमाणेच नव्हे का ? ‘असे पोलीस हिंदूंचे रक्षण करण्यास कसे पुढे येतील ?’, अशी चिंता वाटते. वरील दोन्ही घटनांवरून ‘हिंदूंनी त्यांचे रक्षण करण्यासाठी किती सक्षम असले पाहिजे’, हे प्रकर्षाने लक्षात येते.

मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश यांचा आदर्श घ्या !

मध्यप्रदेशमध्ये खरगोन भागात हिंदूंवर आक्रमण करणाऱ्यांच्या घरांवर प्रशासनाने बुलडोझरने कारवाई करून ती पाडली आणि ७७ जणांना अटक केली. यापुढे हिंदूंवर आक्रमण करतांना तेथील धर्मांध १०० वेळा विचार करतील.

सध्या चैत्रगौरीचे नवरात्र चालू असल्याने उत्तरप्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील गाझियाबाद या मुसलमानांची अधिक वस्ती असलेल्या औद्योगिक शहरामध्ये रमझान चालू असूनही ९ दिवस मांसविक्री होत नाही. त्याविषयी एका वाहिनीच्या वार्ताहराने तेथील मुसलमानांना ‘काही अडचण नाही का ?’, असे विचारले असता अनेकांनी त्याविषयी त्यांना काहीच अडचण नसल्याचे आणि ‘सर्वजण आपापला धर्म पाळत आहेत’, असे सांगितले. ‘धर्मांधांच्या मानसिकतेत हा पालट योगी शासनाच्या शासनपद्धती झाला आहे’, असे म्हणण्यास वाव आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांना त्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मैदानात उतरवले आहे. विदेशात राहिलेल्या या पुत्राने आल्यापासून जातीयवादी विद्वेषी बोलण्याचा सपाटा लावला आहे.

मानखुर्द येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर या महाशयांनी ‘उच्चवर्णीय आणि ब्राह्मण दंगली करतात’, असे जातीयवादी विधान केले आहे. धर्मांधच सर्वत्र दंगली घडवत असतांना आणि हिंदूऐक्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता निर्माण झाली असतांना सुजात यांनी अशी विधाने करणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की, हिंदूंनो, काळ कठीण आहे, यातून तरून जाण्यासाठी स्वतःला शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम बनवा !