मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वरळी येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या सर्व आरोपींना १२ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. ‘सी.सी.टी.व्ही. फूटेज’ वरून या आरोपींना अटक करण्यात आले आहे.
आझाद मैदानावर आंदोलन करतांना एस्.टी. कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी दगडफेक, तसेच चप्पल भिरकावण्याचे प्रकार केले होते. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक अन्वेषण चालू आहे.