युक्रेनी सैन्याकडून रशियन सैनिकांना हुसकावून लावण्यास आरंभ ! – अमेरिकेचा दावा

युक्रेनची राजधानी कीवच्या पश्चिमेला असलेल्या मकारिव शहरामध्ये पुन्हा एकदा युक्रेनचा ध्वज फडकावण्यात आला आहे.

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

जम्मू-काश्मीरमधील विदेशी गुंतवणूक शिखर परिषदेत संयुक्त अरब अमिरातचा सहभाग

जम्मू-काश्मीरमध्ये विविध क्षेत्रात गुंतवणुकीची क्षमता आहे. अशी गुंतवणूक भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यासाठी, विशेषतः काश्मीरसाठी लाभदायी आहे, असे या गटाचे नेतृत्व करणारे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला महंमद युसुफ यांनी सांगितले.

पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फ उष्णतेमुळे वितळत असल्याने अनेक देश आणि द्वीप पाण्याखाली जातील ! – शास्त्रज्ञांची चेतावणी

पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर अचानक तापमानात वाढ झाली आहे. बर्फाची चादर हटल्यामुळे उष्णता वाढून भूमी आणि समुद्र दोघांवरही परिणाम होईल !

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे पॅकबंद दूध, तसेच मॅगी महाग !

अमूल, मदर डेअरी आणि पराग यांसारख्या सहकारी दूध संघांचे ‘पॅकबंद दूध’ प्रतिलिटर २ रुपयांनी महागले आहे. ‘नेस्ले’च्या ‘मॅगी नूडल्स’च्या लहान पाकिटावर २ रुपये, तर मोठ्या पाकिटासाठी ३ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

भारताने प्रथमच एका वर्षात केली ४०० बिलियन डॉलर्सची निर्यात !

‘आत्मनिर्भर भारता’च्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बळावर आर्थिक वर्ष २०२१-२२ संपायच्या ९ दिवस आधीच भारताने ४०० बिलियन डॉलर्सची (३० सहस्र ५४० कोटी रुपयांहून अधिक रकमेची) निर्यात केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

१८१ सोनोग्राफी चाचणी केंद्रांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा, तर १५ केंद्रांची मान्यता रहित ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

गर्भलिंग निदान चाचणीच्या संदर्भात कायदेशीर तरतुदींचा भंग केल्याचे प्रकरण

(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून मिळालेले १५० कोटी रुपये काश्मिरी हिंदूंसाठी दान करावे !’ – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कुणी का करत नाही ?

हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गृहराज्यमंत्र्यांची घोषणा !

मागील वर्षभरात जुगाराच्या ४२९, तर मद्याच्या १ सहस्र ६० तक्रारी ! एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेले अवैध धंदे हे पोलीस आणि प्रशासन यांचे अपयशच म्हणावे लागेल !